पुणे - शहरातील सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करण्यासाठी महापालिकेने त्याचा आराखडा तयार करुन तो मंजुरीसाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने यासाठी अमृत दोन या योजनेतून या प्रकल्पाच्या ८४२ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.