MPSC Group C Online Exam Protest: एमपीएससी गट-क ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध; फडणवीसांचे चर्चेनंतरच अंतिम निर्णयाचे आश्वासन

एमपीएससी गट-क ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध; पेपरफुटी, तांत्रिक अडचणींचा दाखला देत ऑफलाइन पद्धती कायम ठेवण्याची मागणी
Students protest against MPSC Group C online examination decision

Students protest against MPSC Group C online examination decision

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही संगणक प्रणाली आधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने गट-क संवर्गातील सर्व पदे एमपीएससीकडे वर्ग केल्याचे स्वागत असले, तरी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेऊन परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com