
road potholes
पुणे - शहरातील लहान मोठ्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत, रस्ते असमान पातळीत असल्याने वाहनाचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे. याविरोधात नागरिक तक्रार करतातच, पण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्यांची तक्रार केली. पुण्यातील रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा अशी सूचना केल्याने पथ विभागातही खळबळ उडाली आहे.