

yashwant Sugar Factory Land
Sakal
मार्केट यार्ड - राज्य सरकारने यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन २९९ कोटी रुपयांना घेण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला परवानगी दिली होती. मात्र, या व्यवहारासाठी महसूल विभागाची परवानगी घेतलेली नव्हती.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत महसूल विभागाने तत्काळ तपासणी करावी आणि तोपर्यंत या व्यवहाराला स्थगिती द्यावी, असे स्पष्ट निर्देश नागपूर येथे दिले. त्यामुळे यशवंत कारखान्याच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणाला स्थगिती मिळाली आहे.