Pune News : मुख्यमंत्री घेणार पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांची झाडाझडती; प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमांना गैरहजर राहणाऱ्या ९६ नगरसेवकांना नोटीस

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला दांड्या मारणाऱ्या तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी तोंड दाखवून निघून जाणाऱ्या पुणे महापालिकेच्या १२६ पैकी ९६ नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने उडाली खळबळ.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

esakal

Updated on: 

पुणे - भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला दांड्या मारणाऱ्या तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी तोंड दाखवून निघून जाणाऱ्या पुणे महापालिकेच्या १२६ पैकी ९६ नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडालेली आहे. त्यातच आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. १४) पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक घेणार असून, त्यात पदवीधरसाठी किती नोंदणी केली यावरून झाडाझडती घेतली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com