
Devendra Fadnavis Announcement
esakal
गराडे : ‘‘रामोशी- बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत, यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज बिगरव्याजी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पोलिस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण व प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातील. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढे ही सहकार्य करण्यात येईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.