Eknath Shinde: चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde first reaction after Chandni Chowk Demolition bridge in pune

Eknath Shinde: चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच...

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूकीला अडचणीचा ठरत असलेला चांदणी चौक येथील जूना पूल आज अखेर स्फोटाकांच्या मदतीने पाडण्यात आला. काही दिवसांपूर्वी या पूलाच्या परिसरातील वाहतूक कोंडीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अडकले होते. दरम्यान आज अखेर चांदणी चौकातील हा पूल पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुण्याहून साताऱ्याकडे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कोंडीची समस्या नागरिकांनी मला सांगितली, मी त्या भागाचा सर्व्हे केला त्यानंतर एनएचआय, पीडब्लूडी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर तेथे वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेतला. कंट्रोल ब्लास्टींगने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. आज तो पूल पाडण्यात आला.

हा पूल पाडल्यानंतर नवीन पुलाचं काम सुरू होईल, सर्व्हिस रोडसह सर्वांच काम लगेच सुरू होईल. लवकरच त्या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व आवश्यक बाबी केल्या जातील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पुढे बोलताना यासाठी किती वेळ लागेल असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, काम लगेच सुरू होऊल, काम मंजूर आहे. या पूलामुळे काम थांबलेलं, या पुलामुळे बॉटल नेक होत होतं म्हणून हा पूल पाडण्यात आला आहे असे ते म्हणाले.

हेही वाचा: Video : अवघ्या ६ सेकंदात जमीनदोस्त होणार चांदणी चौकातील पूल, कसा? जाणून घ्या

पुण्याच्या पश्चिम भागातील चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम नियोजनाप्रमाणं पूर्ण झाल्याचा दावा कंपनीच्या मुख्य इंजिनिअर आनंद शर्मा यांनी सांगितलं आहे. त्यामुळं हा पूल पडल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. यानंतर आता पूलाच्या बाजूचा राडारोडा पोकलेनंच्या बाजूनं दूर केला जात आहे. हा संपूर्ण राडारोडा दूर करायला आणखी चार-पाच तास लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा: Pune Chandani Chowk Bridge Demolished : पूल पाडण्याचं काम फत्ते; कंपनीचं स्पष्टीकरण