
पुणे : ‘‘देशात २०१९ मध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात जेवढे प्रकल्प सुरू होते. त्यापैकी एकट्या महाराष्ट्र ४९ टक्के प्रकल्पांची कामे सुरू होती. परंतु आज मागे वळून पाहताना त्यापैकी जवळपास ४० टक्के प्रकल्प रखडले आहेत, याची खंत वाटते,’’ असे सांगून ‘एखाद्या प्रकल्पाचे काम हाती घेताना सर्व विभागांनी समन्वय साधून योग्य नियोजन केले, तरच प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. लीडरशिप आणि ओनरशिप घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.