CM Devendra Fadnavis
Sakal
पुणे
CM Devendra Fadnavis : संशोधनासाठी स्वातंत्र्य गरजेचे, देवेंद्र फडणवीस; ‘सीओईपी अभिमान पुरस्कार २०२५’ सोहळा
Engineers Day : सीओईपी अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता व संशोधनाला स्वातंत्र्य देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पुणे : ‘‘सीओईपीसारख्या नावाजलेल्या आणि दीर्घ परंपरा लाभलेल्या संस्थांमधून होणारे संशोधन समाजाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी आवश्यक आहे. ‘सीओईपी’सह इतर शैक्षणिक संस्थांना अधिक स्वायत्तता उपलब्ध करून दिल्यास त्यांचे संशोधन अधिक फलद्रूप होईल. संशोधकांची संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य असेल तरच संशोधक मोकळ्या आणि मुक्त मनाने संशोधन करू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.