

Post-Result Flex Hoardings Violate Rules, Disfigure South Pune
Sakal
स्वारगेट: ‘‘शहरात होर्डिंग, फ्लेक्स लावून पुण्याचे विद्रूपीकरण करू नका,’’ असा सल्लावजा आदेश महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. या मुलाखतीनंतर निकाल लागला आणि शहरातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या अभिनंदनाची होर्डिंग ठिकठिकाणी झळकावून मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.