Pune Traffic : ‘सीएनजी’साठी थांबलेले रिक्षाचालक ‘गॅस’वर; वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा आरोप
Auto Rickshaw : पुण्यात सीएनजीसाठी लागणाऱ्या रांगेमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या अडथळ्यांवर पोलिस कारवाई करत असल्यामुळे रिक्षा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुणे : ‘सीएनजी’ केंद्रावर रांगेत थांबल्यानंतर वाहतुकीला अडथळा आणल्यावरून वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करीत असल्यावरून रिक्षा संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारवाई थांबली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा पंचायतीच्या नितीन पवार यांनी दिला.