

Pune Municipal Corporation election
sakal
पुणे - डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पटापट निविदा मंजूर करून घेण्याची धडपड सुरु झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ४०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यामध्ये कचरा वाहतुकीसाठी पाच वर्षासाठी ३४० घंटागाड्या घेतल्या जाणार असून, त्यासाठी तब्बल २८० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.