

The Imperative of Self-Reliance in R&D: Leela Poonawalla’s Vision
Sakal
पुणे : तंत्रज्ञानाचा स्वीकार, त्यातील बदल आणि त्याचा उद्योग-व्यवसायासाठी प्रभावी वापर करण्यात आपण यशस्वी ठरलो असलो, तरी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या बाबतीत देश अजूनही मागे आहे. त्यामुळे संशोधन आणि विकास (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) क्षेत्रात मोठी झेप घेतल्याशिवाय जागतिक स्पर्धेत पुढे जाता येणार नाही, असे मत लीला पूनावाला फाउंडेशनच्या संस्थापिका लीला पूनावाला यांनी व्यक्त केले.