पुणे शहरात थंडीचा कडाका वाढला; किमान तापमान @११.१ सेल्सिअस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cold in Pune

दिवसेंदिवस पुणे शहरातील सरासरी किमान तापमानात लक्षणीय घट होत असल्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.

Cold Pune : पुणे शहरात थंडीचा कडाका वाढला; किमान तापमान @११.१ सेल्सिअस

पुणे - दिवसेंदिवस शहरातील सरासरी किमान तापमानात लक्षणीय घट होत असल्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. आठवडाभरापूर्वी २० अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान आता ११.१ अंश सेल्सिअसवर येऊन ठेपले आहे. मात्र, उत्तरेतील थंडी स्थिरावल्यामुळे पुढील आठवड्यात किमान तापमानात काहीशी वाढ होईल. परिणामी थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

उत्तरेतील थंड वारे आणि शहरातील निरभ्र आकाशामुळे डिसेंबरच्या पहिल्याच दिवसापासून कडाक्याची थंडी पडली असून, सोमवार (ता. ५) पर्यंत किमान तापमानातील ही घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. २८ नोव्हेंबर) १७.१ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान शुक्रवारी (ता. २) ११.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तसेच वाऱ्यांमुळे पहाटे आणि रात्री बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे हा आठवडा तरी घराबाहेर पडताना पुणेकरांना थंडीपासून बचाव करणाऱ्या उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. पुढील आठवडाभर तरी शहरात आकाश प्रामुख्याने निरभ्र आणि पहाटे धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) -

  • सोमवार (ता. २८ नोव्हेंबर) - १७.१

  • मंगळवार (ता. २९) - १५

  • बुधवार (ता. ३०) - १४.३

  • गुरुवार (ता. १ डिसेंबर) - ११.९

  • शुक्रवार (ता. २) - ११.१