पुण्यात गारठा वाढला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

महाराष्ट्रही कुडकुडणार 
कोरडे हवामान आणि उत्तरेकडून पुन्हा वाहू लागलेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शेकोट्या पेटल्या आहेत. सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार असल्याने महाराष्ट्र थंडीने कुडकुडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

पुणे - शहरात गुरुवारी रात्रीपासून गारठा जाणवू लागला होता. गेल्या दोन दिवसांपासून असेलल्या ढगाळ वातावरणामुळे थंडीने काढता पाय घेतला होता. मात्र, गेल्या चोवीस तासांपासून हवामानात बदल झाला. आकाश निरभ्र झाले. त्याचा थेट परिणाम म्हणून पुणे गारठले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता १४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यात बरोबर चोवीस तासांनी दोन अंश सेल्सिअसची घट झाली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा १४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold increase in pune