यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र पुणेकरांनी अनुभवली;आणखी दोन दिवस थंडीचा कडाका

यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र पुणेकरांनी अनुभवली;आणखी दोन दिवस थंडीचा कडाका
Updated on

पुणे - यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र पुणेकरांनी सोमवारी अनुभवली. पुण्यात अवघ्या नऊ दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा निम्म्याने घसरला. शिवाजीनगर येथे १३ डिसेंबरला १८.७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले गेलेले किमान तापमान सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ९.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात थंडी कायम राहणार आहे. 

पुण्यात डिसेंबरच्या सुरवातीला गारठा जाणवू लागला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत ६ डिसेंबरला १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत पारा उतरला. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण झाले. त्यामुळे थंडीने शहरातून काढता पाय घेतला. पुण्यात १३ डिसेंबरला किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ७.५ अंश सेल्सिअसने वाढून १८.७ नोंदला गेला. त्यानंतर कमी दाबाचा प्रभाव कमी झाला. काश्‍मीर, हिमाचल प्रदेशच्या भागात हिमवृष्टी सुरू झाली. उत्तरेत थंडी पसरली. तेथून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला. त्याचा थेट परिणाम पुण्यातील किमान तापमान कमी होण्यात झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

किमान तापमानाच्या नोंदी 
पुण्यात ५२ वर्षांपूर्वी म्हणजे २७ डिसेंबर १९६८ रोजी आतापर्यंतची सर्वांत कमी म्हणजे ३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. शहरात गेल्या १० वर्षांमध्ये ५.९ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला. गेल्यावर्षी मात्र सर्वांत उबदार डिसेंबर ठरला. किमान तापमान १३.७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले नाही. यंदा तो प्रथमच १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com