
पुणे ः शहरातील काही तरुणांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या "पुणे प्लॉगर्स'चा आदर्श घेत आता राज्यातही "प्लॉगींग'ची चळवळ सुरू झाली आहे. दैनंदिन वापरातून पर्यावरणात आढळणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया व्हावी आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता यावे या अनुषंगाने आता राज्यातील विविध शहरांमध्ये "प्लॉगींग'ची सुरवात करण्यात आली आहे. "प्लास्टिकमुक्त शहर' या संकल्पनेला चालना देण्यासाठी विविध शहरातील एक हजार 500 हून अधिक नागरिक प्लॉगिंग मोहीम राबवीत आहेत.
शहरातील वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे व्यथित झालेल्या 24 वर्षाच्या विवेक गुरव यांनी गेल्या वर्षी "पुणे प्लॉगर्स' संस्थेची स्थापना केली होती. त्याच्या या मोहिमेत आता 500 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. वर्षभरात संस्थेच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये 150 "प्लॉगिंग ड्राईव्ह'च्या मोहिमा राबविण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 120 टन प्लास्टिकचे संकलन करण्यात आले आहे.
या चळवळीबाबत विवेक म्हणाला, ''दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा कचरा वर्षानुवर्षे पर्यावरणात तसाच राहतो. त्यामुळे अशा कचऱ्यावर वेळेत आणि योग्य प्रक्रिया व्हावी, हा प्रयत्न संस्थेकडून करण्यात येत आहे. पुण्यातील असा प्रयोग पाहता, आता राज्यातील विविध तरुणांनी आपापल्या शहरात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये याची सुरवात झाली आहे. यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे. तर, जानेवारी 2020 पासून अहमदनगर, बीड, अकोला, लातूर, सोलापूरमध्येही याची सुरवात केली जाणार आहे.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्लॉगिंग म्हणजे काय ?
जॉगिंग करताना परिसरात आढळणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करणे. तसेच या कचऱ्याला पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेला पाठविणे म्हणजेच "प्लॉगिंग'. तर या प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलनाच्या प्रक्रियेला "प्लॉगिंग ड्राईव्ह' असे म्हटले जाते.
शिक्षणासाठी पुण्यात होतो, तेव्हा पुणे प्लॉगर्स संस्थेबद्दल समजले. तसेच या संस्थेबरोबर काम करण्यास सुरवात केली. मात्र लॉकडाऊनच्या काळात नागपूरला आल्यावर येथेही असा उपक्रम सुरू करण्याचे ठरविले. तर नागपूरमध्येही या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.''-अमल सुतोने, स्वयंसेवक - "नागपूर प्लॉगर्स'
आतापर्यंत झालेले संकलन
शहर ः प्लॉगिंग ड्राईव्हच्या मोहिमा ः संकलन (किलोमध्ये)
कोल्हापूर ः 50 ः 2000
नागपूर ः 4 ः 300
नाशिक ः 8 ः 500
औरंगाबाद ः 6 ः 420
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.