पुण्यातील महाविद्यालयांची वसतिगृहे आता विलगीकरण कक्ष

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

पुण्यात रोज कोरोनाचे हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत असताना त्यांना विलग ठेवण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नाही, घरात व्यवस्था नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांची वसतीगृहे ’कोवीड केअर सेंटर’ (सीसीसी’) म्हणून कार्यान्वित केली जात आहेत. यामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त जणांची व्यवस्था होणार आहे.

पुणे - पुण्यात रोज कोरोनाचे हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत असताना त्यांना विलग ठेवण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नाही, घरात व्यवस्था नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांची वसतीगृहे ’कोवीड केअर सेंटर’ (सीसीसी’) म्हणून कार्यान्वित केली जात आहेत. यामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त जणांची व्यवस्था होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेने खासगी रुग्णालये या रुग्णांच्या उपचारासाठी सेवेत आणली. पण तिथेही जागा शिल्लक नाही. सौम्य, मध्यम लक्षणे असणारे रुग्ण जास्त असल्याने त्यांनी रुग्णालयांमधील बेड व्यापले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही अशी अवस्था आहे. यासाठी महापालिकेने रुग्णांना घरीच विलग करण्याचा निर्णय घेतला. पण बहुंताश रुग्णांना घरी व्यवस्था करणे शक्‍य नाही. त्यासाठी आता महाविद्यालयांच्या वसतीगृहात व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी पूर्ण व्यवस्था महापालिकेने केली आहे. तर काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्यवस्था केली जात आहे.

पुण्यात तीन जम्बो हॉस्पिटल तातडीने उभारावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

सध्या सीओईपी, फर्ग्युसन महाविद्यालयात, आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथील हॉस्टेल, एसएनडीटी, संत ज्ञानेश्वर हॉस्टेल येरवडा, ट्रिनीटी महाविद्यालय हॉस्टेल यासहइतर ठिकाणी रुग्णांची व्यवस्था केली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थ भारत अभियानाअंतर्गत विविध सेवा प्रकल्प सुरू आहेत, त्यापैकी क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णसेवा केली जात आहे. सध्या गरवारे महाविद्यालयात व्यवस्था केली आहे. 
- सुनील खेडकर, प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

रुग्णसंख्या वाढणार आहे, त्याचा विचार करून सुमारे १५ शिक्षण संस्था व वसतीगृहांमध्ये विलगीरणाची व्यवस्था करत आहोत. 
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महापालिका

'एमपीएससी' टाकतेय कात, लवकरच येणार अ‍ॅप

संस्था व बेडची संख्या

 • सीओईपी वसतीगृह.............   ६००
 • एमएमसीसी कर्वेनगर ............२४०
 • ट्रिनीटी महाविद्यालय हॉस्टेल....    २२५
 • एसएनडीटी......................२१२
 • संत ज्ञानेश्वर हॉस्टेल येरवडा.....३६०
 • आबासाहेब गरवारे महाविद्यालय....... ३००
 • फर्ग्युसन महाविद्यालय............३००
 • कमिन्स कॉलेज, वारजे...........६००
 • शेतकी महाविद्यालय, शिवाजीनगर ... ८००
 • पुणे विद्यापीठ...................    ३००
 • भारती विद्यापीठ कोथरूड.......    २५०
 • आंबेडकर हॉस्टेल येरवडा......     २४०
 • एमआयटी कोथरूड.............    ३५०
 • सिंबायोसिस हॉस्टेल............    ४००
 • विमाननगर जेएसपीएम हडपसर..... ४००

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College dormitories in Pune now have segregation rooms