esakal | धक्कादायक : आईवडील शिक्षक असलेल्या कोथरुडमधील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

बोलून बातमी शोधा

suicide.jpg

कोथरूड येथे एका महाविद्यालयीन तरुणाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र संबंधित तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

धक्कादायक : आईवडील शिक्षक असलेल्या कोथरुडमधील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोथरूड येथे एका महाविद्यालयीन तरुणाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र संबंधित तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूर्यकांत सुभाष बामणे (वय २४, रा. शिल्पा सोसायटी, एमआयटी महाविद्यालय रस्ता, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत हा एका महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील सातारा परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्याालयात प्राध्यापक आहेत. तर आई शिक्षिका आहेत. बामणे कुटुंबीय कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. ते राहत असलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून एमआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शिल्पा सोसायटीत फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन राहत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सूर्यकांतचे वडील सातारा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी सूर्यकांत झोपेतून जागा झाला. वडील घरातून बाहेर पडल्यानंतर तो पाणी पिऊन पुन्हा  झोपायला गेला. सकाळी साडेआठच्या सुमारास सूर्यकांत झोपेतून जागा झाला नाही. आईने त्याला जागे करण्यासाठी दरवाजा वाजविला. त्यानंतरही त्याने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्याच्या आईने सूर्यकांतच्या मामाला याबाबत माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मामाने दरवाजा वाजवुनही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी सूर्यकांतने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्या खोलीत कोणत्याही प्रकारची चिठ्ठी पोलिसांना सापडली नाही. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.