शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी बनले ‘शिक्षण दूत’

कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष अभ्यासिका भरविणे शक्य नव्हते. म्हणून जवळपासच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे छोटे गट करून अभ्यासाला सुरवात झाली.
Library
LibrarySakal

पुणे - पालकांचे (Parents) दिवसभर कामाला असणे, त्यांच्याकडे स्मार्टफोन (Smartphone) नसणे, फोन असला तरी त्यावर अभ्यासासाठी इंटरनेटची (Internet) सोय नसणे, मुलांना आशय न समजणे, प्रश्न विचारण्याची सोय नसणे, अशा असंख्य अडथळ्यांमुळे शिक्षणाच्या (Education) प्रवाहातून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Student) खुद्द महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी (College Student) पुढाकार (Initiative) घेऊन बाल शिक्षण मंचामार्फत ‘शिक्षण दूत’ (Education Ambassadors) होऊन शिक्षणाची वाट मोकळी करून दिली. (College Students become Education Ambassadors Moving Away Stream of Education)

मार्केटयार्ड परिसरातील महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांची शाळा मागील वर्षीच बंद झाली. बहुतेक पालक मोलमजुरीसाठी घराबाहेर असल्यामुळे दिवसभर मुले काय करत आहे, याकडे लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे काही वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका वर्ग चालविणाऱ्या बाल शिक्षण मंचाने शक्कल लढविली.

Library
पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष अभ्यासिका भरविणे शक्य नव्हते. म्हणून जवळपासच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे छोटे गट करून अभ्यासाला सुरवात झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे नीरज यादव, विजय गायकवाड, गोपी पाटील, सचिन मुले, पूजा पराते, शिवम राम, अश्विनी यांनी जवळपासच्या ४० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आठ-आठ मुलांचे गट करून, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी त्यांना अभ्यासक्रमातील धडे देऊ लागलेत.

गेल्या आठ महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचे शिक्षण अव्याहतपणे सुरु आहे. यामध्ये मुलांचे प्राथमिक लेखन, वाचन, गणिती क्रिया खेळ, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव यावर भर दिला जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अमर पोळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com