महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पीएमपी बसने प्रवास करावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

विद्यार्थ्यांनी पीएमपी बसचा वापर करण्यासाठी प्रशासनाने शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व महाविद्यालयांशी संपर्क साधून अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातंर्गत महाविद्यालयांत पीएमपीबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

पुणे - विद्यार्थ्यांनी पीएमपी बसचा वापर करण्यासाठी प्रशासनाने शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व महाविद्यालयांशी संपर्क साधून अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातंर्गत महाविद्यालयांत पीएमपीबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपी बसमधून दररोज सुमारे १२ लाख प्रवाशांची वाहतूक होते. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दीड ते दोन लाख आहे. शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीतर्फे सवलतीच्या दरातील पास दिले जातात. त्यांचीही संख्या सुमारे दीड लाख आहे; परंतु दोन्ही शहरांत मिळून विद्यार्थ्यांची संख्या सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पीएमपी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. 
दोन्ही शहरांतील सर्व महाविद्यालयांना प्रशासनाकडून पत्र पाठविण्यात येत आहे.

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस येत आहेत. अल्पावधीतच सुमारे ६०० नव्या बसही दाखल होतील. त्यामुळे वातानुकूलित बस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी कोणताही जादा तिकीट दर नसेल. याबाबत महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. तसेच महाविद्यालयाच्या आवारात फ्लेक्‍स लावण्यासाठी परवानगी द्यावी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविण्यात सहभाग होण्याचे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College students should travel by PMP bus