esakal | पुणे : मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याची धिंड
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याची धिंड

बारावीच्या विद्यार्थीनीला गुण वाढवून देतो सांगत त्याबदल्यात शरीरसुखाची मागणी कॉलेजमधील कर्मचाऱ्याने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याची धिंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवत बारावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थिंनीकडे कॉलेजमधील एका कर्मचा-याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नामांकित महाविद्यालयात घडला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनीच्या घरच्यांनी संबंधित कर्मचा-याला चोप देत बुधवारी (ता. १४) त्याची महाविद्यालय ते पोलिस ठाण्यापर्यंत काळे फासत धिंड काढली. कर्मचा-याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित पवार असे या कर्मचा-याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील कर्मचारी आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यासारखी प्रशासकीय कामे तो करीत. पीडित मुलगी येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. मार्क वाढवून देतो, असे म्हणते त्याने या विद्यार्थिंनीकडे शरीर सुखाची मागणी केली होती. गेले तीन दिवस तो ही मागणी करीत होता. विद्यार्थिनीने पवार याच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग देखील केले आहे. हे रेकॉर्डिंग ऐकल्यावर संतप्त पालकांनी बुधवारी महाविद्यालयात गाठले. त्यानंतर पवार याच्या तोंडाला काळे फासत त्याची पोलिस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली.

हेही वाचा: सॉरी गुड्डी ! फेसबूक पोस्ट करत पुण्यातील प्रोफेसरची आत्महत्या

मार्क वाढवून टॉप लेव्हलला पोचवतो

अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवतो, स्कॉलरशीप मिळवून देतो, मार्क वाढवून टॉप लेव्हलला पोचवतो, असे आमिष पवार याने विद्यार्थिंनीना दाखवले होते. तो गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिंनी ही आमिषे दाखवत होता. विद्यार्थिनीने घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी गामिनी कावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महाविद्यालय गाठले. यानंतर पवार याला जाब विचारला. मात्र त्याने सर्व आरोप फेटाळले. पण विद्यार्थिनीने रेकॉडिंग दाखविल्यावर मात्र त्याची बोलती बंद झाली.

पालकांनी संबंधित कर्मचा-यास पोलिस ठाण्यात आणले आहे. त्याविरोधात विनयभंग व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. इतर कोणासोबत असा प्रकार झाला असल्याचे त्यांनी तक्रार करण्यास पुढे यावे. असा प्रकार पुन्हा होवू नये, याबाबतच्या सूचना संबंधित विद्यालयाच्या प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. विजय तिकोने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. हा सर्व प्रकार ऐकून आईवडिलांनी महाविद्यालयात जाऊन शिक्षकाच्या अंगावर शाई फेकत विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये आणलं. त्यानंतर पीडित मुलीची तक्रार पोलिसांनी घेतली असून पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे.

loading image