esakal | विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना ‘एआएसएचई’च्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University

संलग्न महाविद्यालयांना ‘एआएसएचई’च्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी आणि परिसंस्थांनी ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’च्या (एआएसएचई) पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांनी दरवर्षीप्रमाणे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची माहिती वेबपोर्टलवर भरण्याबाबत अनेकदा सूचना केल्या आहेत. नव्याने मान्यता दिलेल्या संस्थांनीही नोंदणी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: शिरूर तालुक्याची पाण्याची चिंता मिटली, भामा आसखेड धरण शंभरी जवळ

नोडल अधिकाऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, महाविद्यालय व परिसंस्थांचा नोंदणी क्रमांक, ई-मेल आयडी, शासन निर्णय, संलग्नीकरणाचे पत्र अशी माहिती पोर्टलवर अपलोड करून महाविद्यालयांना नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांना, त्याबाबतचा खुलासा उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे, असेही विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे सहाय्यक कुलसचिव पां. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

loading image
go to top