esakal | शिरूर तालुक्याची पाण्याची चिंता मिटली, भामा आसखेड धरण शंभरी जवळ
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर तालुक्याची पाण्याची चिंता मिटली, भामा आसखेड धरण शंभरी जवळ

शिरूर तालुक्याची पाण्याची चिंता मिटली, भामा आसखेड धरण शंभरी जवळ

sakal_logo
By
रुपेश बुट्टे

आंबेठाण: सध्या सर्वांचे लक्ष लागेलेले भामा आसखेड धरण अखेर ९९.८६ टक्के भरले असून, धरणात येणाऱ्या पाण्याच्या जोरावर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षीपेक्षा उशिरा का होईना धरण भरणार आहे.खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या भामा आसखेड धरणात सध्या (दि.१६) ९९.८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरण ९६.२७ टक्के भरले होते.

हेही वाचा: मनोहर भोसले याची पोलिस कोठडी तीन दिवसांनी वाढली

यावर्षी धरण भरण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांसह या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरी भागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सुरुवातीला धरण भरणार की नाही याची नागरिकांना धास्ती वाटत होती. मागील चार पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पाणीसाठा वाढत होता परंतु कालपासून धरण क्षेत्रात अवघा १ मिमी पाऊस झाला आहे त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.

बहुतांश चाकण एमआयडीसीसह चाकण शहर आणि तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील गावांसाठी याचा फायदा होणार आहे. भामा आसखेड धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. खेडच्या पश्चिम भागात भामा आसखेड हे मातीचे धरण आहे.चालू वर्षी एक जून पासून धरण क्षेत्रात ८६१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर काल दिवसभरात १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

धरणात सध्या ८.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर जिवंत पाणीसाठा हा ७.६५ टीएमसी इतका आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौड या तीन तालुक्यांना होत असतो. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांना वरदान ठरले आहे.

loading image
go to top