esakal | पुण्यातील झोपडपट्ट्यांत झाले कोम्बिंग ऑपरेशन
sakal

बोलून बातमी शोधा

combing operation in the slums aera

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेतर्फे सोमवारी रात्री शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये १६६ सराईत गुन्हेगारांपैकी ८५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पाच हॉटेलवर नोंदणीपुस्तिका अद्ययावत न ठेवल्यामुळे कारवाई केली.

पुण्यातील झोपडपट्ट्यांत झाले कोम्बिंग ऑपरेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेतर्फे सोमवारी रात्री शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये १६६ सराईत गुन्हेगारांपैकी ८५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पाच हॉटेलवर नोंदणीपुस्तिका अद्ययावत न ठेवल्यामुळे कारवाई केली. 

गणेशोत्सवात देश-परदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक पुण्यामध्ये येतात. चोरटे व गुन्हेगारांकडून भाविकांना लक्ष्य करण्याची दाट शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन गुन्हे शाखेने झोपडपट्ट्यांमध्ये सोमवारी दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सर्व युनिट व अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली.

गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कासेवाडी, कामगार पुतळा, राजीव गांधी झोपडपट्टीत कारवाई केली. त्यामध्ये ४८ गुन्हेगार तपासले, त्यापैकी २८ जण सापडले. युनिट दोनच्या पथकाने डायस प्लॉट औद्योगिक वसाहत, महर्षीनगर झोपडपट्टीत केलेल्या कारवाईमध्ये १८ पैकी तीन गुन्हेगार सापडले. युनिट तीनने जनता वसाहत, तुकाईनगर परिसरात पाहणी करुन २१ पैकी ११ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. 

युनिट चारच्या पथकाने लक्ष्मीनगर, येरवड्यातील तपासणीत २१ गुन्हेगारांपैकी १६ जण आढळून आले, तर युनिट पाचच्या पथकाने म्हाडा कॉलनी, रामनगर, आनंदनगर, सुरक्षानगर, बिरासदारनगर, इंदिरानगर, वेताळबाबा झोपडपट्टीत कारवाई केली. २० सराईत गुन्हेगार तपासले. त्यामध्ये आठ जण आढळून आले. दरम्यान, हडपसर पोलिसांच्या हद्दीत एक जण कोयता घेऊन फिरत असल्याची खबर मिळाली. त्यास अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने (पश्‍चिम) ताडीवाला रस्ता झोपडपट्टीत १६ पैकी चार गुन्हेगारांना ताब्यात घेतले, तर अमली पदार्थ विरोधी पथकाने (पूर्व) २० गुन्हेगार तपासले. त्यापैकी १५ जण आढळले.

मोकातील गुन्हेगार आढळला
‘मोका’अंतर्गत पूर्वी केलेल्या कारवाईतील ११ गुन्हेगारांपैकी एक जण आढळून आला, तर ‘एमपीडीए’अंतर्गत पाच गुन्हेगार तपासले. ते गुन्हेगार पोलिसांना आढळून आले.

हडपसर, कात्रज, कोंढव्यातील लॉज तपासले
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने १९ लॉज तपासले. त्यांना निधी लॉज (हडपसर), अश्‍विनी लॉज (कात्रज), न्यू रॉयल लॉज (कोंढवा), हॉटेल राज पॅलेस (कोंढवा) व हॉटेल गारवा (कोंढवा) यांनी त्यांच्या लॉजची नोंदणी पुस्तिका अद्ययावत न ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

loading image
go to top