Ashadhi Wari : आळंदी देवस्थानची सोबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dehu Sansthan support of ashadhi wari

Ashadhi Wari : आळंदी देवस्थानची सोबत

पुणे - आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात सहभागी होऊन पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसमवेत आरोग्याचा संदेश देणारा ‘साथ चल’ उपक्रम ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे राबविण्यात येणार आहे. या ‘आरोग्य वारी’स आळंदी देवस्थानचाही सहभाग लाभला आहे. आषाढी वारीच्या माध्यमातून आरोग्य संगोपनाचा संदेश देण्यासाठी ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची’ ही यंदाची संकल्पना आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मोरवाडी ते एचए कंपनी आणि पुणे शहरात पुलगेट अशा तीन ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वारीत सहभागी वारकऱ्यांसमवेत भाविकांनीही वारीत सहभागी होऊन दोन पावले चालावीत, आपल्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश दिला जाणार आहे. यात आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, सोहळा प्रमुख, विश्वस्त मंडळ, मानकरी सहभागी होणार आहेत. उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. या वारीत सहभागी होऊन आपल्या आरोग्य संगोपनाची शपथ घ्यायची आहे.

आरोग्य वारी का?

  • वारीमध्ये सहभागी वैष्णवांसोबत दोन पावले चालण्याचा आनंद

  • ‘साथ चल’ उपक्रमाच्या निमित्ताने चालण्याचा व्यायाम

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती

  • स्वतःसह समाजहितासाठी स्वच्छतेचा सामूहिक संदेश

कुठे व किती वाजता सहभागी व्हाल?

बुधवार (ता. २२ जून) ः मोरवाडी चौक, फिनोलेक्‍स कंपनी प्रवेशद्वार ते एचए कॉलनी प्रवेशद्वार भुयारी मार्गापर्यंत चालणे व दोन्ही ठिकाणी शपथ : १.२ किमी : सकाळी ६

शुक्रवार (ता. २४ जून) ः महात्मा गांधी बसस्थानक, पुलगेट, पुणे कॅम्प येथे शपथ ः सकाळी ६.३०

इथे नोंदवा सहभाग... : व्हॉटस्ॲप ः ८४८४९७३६०२

ई-मेल ः editor.pune@esakal.com

Web Title: Come Along Undertaking Of Sakal Media Group And Finolex Cables

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top