esakal | ‘जिसका माल, उसका हमाल’च्या अंमलबजावणीस देशात प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Hamali

‘जिसका माल, उसका हमाल’च्या अंमलबजावणीस देशात प्रारंभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ट्रकमधून (Truck) ज्याच्या मालाची वाहतूक (Transport) होणार आहे, त्यालाच आता हमाली खर्च (Hamal Expenditure) करावा, लागणार आहे. ऑल इंडिया मोटार टान्सपोर्ट कॉंग्रेसने या ठरावाची अंमलबजावणी आजपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. (Commencement of Implementation of Those Whose Goods Belong to Them Country)

मालवाहतूक करताना, या पूर्वी वाहतूकदारांना माल ट्रकमध्ये चढविण्याचा आणि उतरविण्याचा खर्च करावा लागत असे. या पद्धतीत बदल करण्याची मागणी वाहतूकदारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसकडे सदस्यांनी ठराव दिले होते. देशात सुमारे २ कोटी मालवाहतूकदार आहेत. कोरोनाच्या काळात मालवाहतूकदारांच्या व्यवसायावर अनेक निर्बंध आले. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली होती. त्यामुळे हमालीबाबतच्या प्रलंबित ठरावावावर कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये नुकताच निर्णय झाला. त्यानुसार १५ जुलैपासून जिसका माल, उसका हमाल या तत्त्वाची अंमलबजावणी करण्याचे ठरले.

हेही वाचा: पुणे : फेसबुकद्वारे ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर बलात्कार

या ठऱावानुसार ज्या व्यक्तिच्या मालाची वाहतूक होणार असेल, त्यानेच माल चढविण्याचा आणि उतरविण्याचा खर्च करायचा आहे. त्याचा वाहतूकदाराशी कोणताही संबंध नसेल. या ठरावाची अंमलबजावणी आजपासून देशात सर्वत्र सुरू झाली आहे. त्यानुसार नागरिकांनीही या बाबत सहकार्य करावे, असे आवाहन ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे सदस्य बाबा शिंदे यांनी केले आहे.

loading image