
देशाची सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे पुणे शहर लॉकडाउनमुळे प्रदीर्घ काळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना दुरावले होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, निर्बंधांचे पालन करत शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मैफिलींना सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.
पुणे - देशाची सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे पुणे शहर लॉकडाउनमुळे प्रदीर्घ काळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना दुरावले होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, निर्बंधांचे पालन करत शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मैफिलींना सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पंडित हृदयनाथ मंगेशकर ‘अक्षय गाणे अभंग गाणे’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन मनोरंजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. २८) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडेपाचला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तसेच, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनेही कार्तिकी एकादशीनिमित्त भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी (ता. २६) सायंकाळी पाचला या कार्यक्रमाचा श्रीगणेशा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. साफसफाई, निर्जंतुकीकरण आणि सुरक्षित अंतर राखणे आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
'कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दबणारे नाही'; फडणवीसांचे महाविकास आघाडीला आव्हान
डिसेंबरमध्ये नाटकांचे प्रयोग
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाट्यरसिकांच्या भेटीसाठी रंगमंच खुला झाला आहे. अद्वैत दादरकर दिग्दर्शित आणि प्रशांत दामले यांची भूमिका असलेले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक डिसेंबरच्या १२ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ तारखेला संध्याकाळी सहा वाजता आणि बालगंधर्व रंगमंदिरात १३ तारखेला साडेबाराला हे नाट्यप्रयोग होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
'अशा निवडणुका जिंकता येत नाहीत'; फडणवीसांचा अजित पवारांना टोला
तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नाटकाचे प्रयोग होत असल्याचा आनंद होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारीचा आढावा आम्ही घेत असून, प्रेक्षकांनीही येताना सर्व काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे.
- प्रशांत दामले, नाट्यअभिनेते
स्पॉटलाइटची ऊब सर्वांनाच हवीहवीशी वाटते. रसिकांची दाद आणि प्रेमाची प्रत्येक कलाकार वाट पाहतोय. आता पुन्हा एकदा कार्यक्रमांना सुरुवात होत असून, योग्य खबरदारीसह रसिकांनी हजेरी लावावी.
- शिरीष रायरीकर, मनोरंजन संस्था
Edited By - Prashant Patil