esakal | व्यावसायिक वीजग्राहकांच्या वीजदरात महावितरणकडून वाढ

बोलून बातमी शोधा

electricity

व्यावसायिक वीजग्राहकांच्या वीजदरात महावितरणकडून वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - निवासी पाठोपाठ बिगर निवासी (व्यावसायिक) वीजग्राहकांच्या वीजदरात महावितरणकडून वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ करताना स्थिर आकारमध्ये (फिक्स चार्जेस) सरसकट १२ रुपये वाढविले आहेत. २० ते ५० किलोवॉट वीजवापर असलेल्या ग्राहकांच्या प्रतियुनिटमध्ये ७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे, तर त्याच्या आतील वापर असणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिटचे दर कमी करून काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून गेल्या वर्षी मांडण्यात आलेल्या वीजदरवाढीचा प्रस्तावास वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. ही वाढ पाच वर्षांसाठी आयोगाकडून देण्यात आली होती. त्यानुसार दरवर्षी फेरआढावा घेऊन १ एप्रिलपासून ती लागू करण्याचे अधिकार महावितरणला मिळाले आहेत. त्यानुसार गेल्या वर्षी दरवाढ लागू केल्यानंतर आता या आर्थिक वर्षासाठीचे प्रतियुनिट आणि फिक्स चार्जेसचे नवीन दर महावितरणकडून एक एप्रिलपासून लागू करण्यात आले आहे. निवासीप्रमाणे बिगर निवासी ग्राहकांच्या वीजबिलातही वाढ होणार आहे.

img

Mahavitran

हेही वाचा: तरूणाचा अनोखा विक्रम; सोळा वेळेस रक्तदान आणि आता प्लाझ्मा दान

असे आहे गणित

  • गेल्या वर्षी म्हणजे २०२०मध्ये स्थिर आकार (फिक्स चार्जेस) ४०३ रुपये होता. त्यामध्ये १२ रुपयांनी वाढ करीत तो आता ४१५ रुपये करण्यात आला

  • गेल्या वर्षी २० ते ५० किलोवॉट विजेचा वापर असलेल्या ग्राहकांना प्रतियुनिटचा दर १० रुपये ७२ पैसे होता. त्यामध्ये ७ पैशांनी वाढ करून तो आता १० रुपये ७९ पैसे करण्यात आला

या ग्राहकांना दिलासा

  • गेल्या वर्षी या ग्राहकांचा प्रतियुनिटचा दर ७.३६ पैसे होता. तो आता कमी करून ७ रुपये १८ पैसे करण्यात आला. या वीजग्राहकांच्या स्थिर आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे

  • ५० किलोवॉटपेक्षा अधिक वापरास प्रतियुनिट वीजदर १२ रुपये ८३ पैशावरून १२ रुपये ९५ पैसे करण्यात आला

  • या सर्व स्लॅबमधील वीजग्राहकांचा वीजवहन चार्ज (व्हिलिंग) १ रुपये ४५ पैशांवरून १ रुपये ३८ पैसे करण्यात आला