esakal | "सेंच्युरी' गाठणाऱ्या डेक्कन पोलिस ठाण्याच्या वास्तूचे आयुक्तांकडून कौतुकI Pune
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस ठाण्याच्या वास्तूचे आयुक्तांकडून कौतुक

"सेंच्युरी' गाठणाऱ्या डेक्कन पोलिस ठाण्याच्या वास्तूचे आयुक्तांकडून कौतुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कुठलीही ऐतिहासिक वास्तु हि त्या विभागासाठी नव्हे, शहरासाठी अभिमानाची बाब असते. अगदी हाच अभिमान पुणे पोलिस दलाच्याही वाट्याला आला आहे. एक, दोन दशके नव्हे, तर 100 व्या वर्षात म्हणजेच "सेंच्युरी' गाठणाऱ्या डेक्कन पोलिस ठाण्याच्या (भाजेकर पॅव्हेलियन) वास्तुचा पुणे पोलिस दलासही विशेष अभिमान आहे. दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही खास डेक्कन पोलिस ठाण्याला भेट देऊन वास्तुच्या आठवणींना उजाळा दिला.

क्रिकेटचा प्रसार सुरू होण्यास सुरूवात झाली तेव्हा 1906 मध्ये क्रिकेटसाठी डेक्कन जिमखाना सुरु झाला. जिमखान्याचे 1908 ते 1911 या कालावधीतील सरचिटणीस एल.आर.भाजेकर यांचे नाव पॅव्हेलियनला दिले गेले. पुढे या भाजेकर पॅव्हेलियनच्या जागेवर काही वर्ष प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु होते, त्यानंतर काही काळ ब्रिटीशांनी इथे रेशनिंगचे दुकानही सुरू केले. पुढे आयुर्वेद रसशाळेचा कारखानाही इथे होता. लोकवस्ती वाढल्यावर पोलिस चौकीची गरज वाटली आणि इथे डेक्कन पोलिस चौकी सुरू झाली. डेक्कन पोलिस ठाण्याची हिच इमारतच म्हणजे भाजेकर पॅव्हेलियन.

हेही वाचा: Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर

या वास्तुने गुरूवारी 100 व्या वर्षात पदार्पण केले. त्याचा डेक्कन पोलिसांनाही मोठा आनंद झाला. या वास्तुला आकर्षक विद्युत रोषणाई लावण्यात आली. खुद्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच या वास्तुला भेट दिली. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ. नामदेव चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक बजरंग देसाई, सुषमा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, " शहरातील वास्तु जितक्‍या जुन्या होतील, तितके त्याचे ऐतिकाहासिक महत्व वाढत जाणार आहे. आधुनिक काळात इमारतीच्या कामात अनेक बदल झाले आहेत. मात्र जुन्या वास्तु जतन करणे महत्वाचे आहे, त्यादृष्टीने डेक्कन पोलिस ठाण्याची इमारत त्याचे मुर्तीमंद उदाहरण आहे.किरकोळ डागडुजी वगळता इमारतीचे देखणेपण आजही कायम आहे. पोलिसांनीही दैनंदिन कामे करतानाच व्यायामाला महत्व दिले पाहीजे.''

loading image
go to top