esakal | प्लाझ्मा दान करण्यासाठी पोलिस आयुक्तांचे पुणेकरांना आवाहन

बोलून बातमी शोधा

Amitabh Gupta
प्लाझ्मा दान करण्यासाठी पोलिस आयुक्तांचे पुणेकरांना आवाहन
sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - कोरोना रुग्णासाठीच आवश्यक प्लाझ्मा दान करण्याच्या एका महिलेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही पुणेकरांना ट्विटरद्वारे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.

वाघोली येथील रिचा जैन या महिलेने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्विटरद्वारे आपण नागरिकांना प्लाझ्मा दान करण्यासंदर्भात आवाहन करावे अशी इच्छा मागणी केली होती. जैन यांच्या या आवाहनास पोलिस आयुक्तांनीही रिट्विट करत जास्तीत जास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

पुणे पोलिसांनी आतापर्यंत कोरोनाशी लढा देताना 17 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गमविल्याचे सांगितले. प्लाझ्मा व रक्ताचा सध्या तूटवडा आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयातील 562 अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी प्लाझ्मा दान केले आहे, 127 लोकांनी रक्तदान केल्याचे गुप्ता यांनी सांगितले, लोकांना जीवदान देण्यासाठी नागरिकांनी रक्तदान व प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.