
pune Traffic issue
पुणे - शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी का होत आहे? याचे कारणे साधून, त्याचा अहवाल सोमवारपर्यंत (ता. २२) सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. अतिक्रमणे, खड्डे, अवैध बांधकाम याकडे प्रश्नांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असतात आता त्यांच्याकडून अहवालात नेमकी काय कारणे दिली जाणार आहेत याची उत्सुकता लागली आहे.