Pune News : मेट्रो इको पार्क खुले करण्यासाठी घेराव; झाडे वाचविण्यासाठी कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक

रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील झाडे वाचविण्यासाठी मेट्रो इको पार्क बचाव कृती समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने आक्रमक भूमिका घेत पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बुधवारी घेराव घातला.
committee activists aggressive to save trees Metro Eco Park pune
committee activists aggressive to save trees Metro Eco Park puneSakal

पिंपरी : रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील झाडे वाचविण्यासाठी मेट्रो इको पार्क बचाव कृती समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने आक्रमक भूमिका घेत पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बुधवारी घेराव घातला. तसेच हे इको पार्क सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. इको पार्कला असलेले कुलूप उघडून झाडांना पाणी द्यावे, इको पार्कच्या आराखड्यानुसार, राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर भविष्यात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करु नये या दोन प्रमुख मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभुस, केदार कोडोलीकर, महेश शिर्के, मंगेश जोशी, प्रियांका पिसे, रोहित गुजर, निखिल जोशी, आकाश बुगडे, प्रवीण सोनवणे, राहुल सुतार, अजय बुलबुले, राहुल घोडेकर,

राहुल वानखेडे, हनुमंत मोहिते यांच्यासह मेट्रो इको पार्क बचाव समितीचे संपत शिंदे,संपत शिंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, संजीव सुठणकर, विकास बडोलिया, ब्रम्हानंद घुगरे, शिवाजी शिर्के, धनश्री कुलकर्णी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आम्ही केलेल्या दोन्ही मागण्यांना जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी संमती दर्शविली आहे. तशा प्रकारचे लेखी आदेश संबंधित अधिकाऱ्यांना काढण्यास सांगितले आहेत. मात्र, दोन दिवसांत मेट्रो इको पार्क नागरिकांसाठी खुले न केल्यास आम्ही तेथे लावलेले कुलूप तोडून झाडांना पाणी देऊ.

- हेमंत संभुस, प्रदेश सरचिटणीस, मनसे

मेट्रो इको पार्कचे अस्तित्व प्रशासनाकडून नाकारले जात आहे. हे पार्क बंद झाले; तर पर्यावरणाचा ऱ्हास होईलच. मात्र, हे तयार करण्यासाठी जो जनतेचा कररूपी पैसा वापरला गेला. तो वाया जाईल.

- विकास बडोलिया, कार्यकर्ता, मेट्रो इको पार्क बचाव समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com