esakal | सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी समिती
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV Camera

सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी समिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहांसाठी खरेदी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही आणि त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीत झालेल्या गैरप्रकारांची समाजकल्याण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवून चढ्या दराने करण्यात आली असल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. जवळपास ५० ते ५५ लाख रुपयांचा यामध्ये घोळ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. सातारा येथील एका ठेकेदार कंपनीकडून ही खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. सहआयुक्त भारत केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमध्ये उपायुक्त अंकुश खेतमाळीस, लेखाधिकारी उदय लोकपल्ली आणि सह लेखाधिकारी विलास मारणे यांचा समावेश आहे.

loading image
go to top