
पुणे - महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठीची जागा ताब्यात घेण्यात महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आता उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली १४ अभियंत्यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती या भागातील जागा मालक, भाडेकरू यांच्याशी चर्चा करून भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडणार आहेत.