Pune News : कात्रजमध्ये मोहल्ला कमिटीच्या बैठकीत राजकीय नेत्यांमध्ये जोरदार वाद
Committee Meeting : कात्रज येथील मोहल्ला कमिटीच्या बैठकीत झोपडपट्टीतील अवैध धंद्यांवरून सुभाष जगताप आणि उद्धव कांबळे यांच्यात वाद झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत तणाव निवळवला.
कात्रज : धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली.