बीआरटी बसथांबा काढल्याने सामान्यांमध्ये नाराजी

मिलिंद संधान.
रविवार, 15 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : रहाटणी साईचौक येथील बीआरटी बसथांबा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. विकास कामांच्या नावाखाली फोडतोड करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांनी ' सकाळ ' च्या माध्यमातून केला आहे. साई चौक स्पॉट 18 समोरील बीआरटी बस थांबा दोन तीन दिवसांपासून जेसीपी द्वारे काढत असल्याचे दृश्य येथील स्थानिकांना पहायला मिळत आहे.

या चौकात उड्डान पुलाचे काम दोन वर्षापासून तर ग्रेडसेपरेटरचे काम मागिल एक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे पुर्वीच जर बसथांब्याचे नियोजन व्यवस्थित केले असते तर आजची परिस्थिती उद्भविली नसती असे उद्विग्नपणे येथील लोकांनी आपल्या भावना सकाळ प्रतिनिधी समोर व्यक्त केल्या.

बीआरटी प्रवक्ता विजय भोजने म्हणाले, " बीआरटी संकल्पना साकारत असताना रस्ता रूंदीकरण झाले. त्यामुळे बीआरटी व्यवस्था सुरळीत तर झाली परंतु काही दिवसातच तेथुन वाहणाऱ्या वाहणांची संख्या वाढल्याने वाहतुक कोंडीला सुरूवात झाली. त्यामुळे वाहतुक कोंडीवर उपाय काढण्यासाठी येथे ग्रेडसेपरेटरचे नियोजन करावे लागले. ग्रेटसेपरेटरचे काम पुर्ण झाल्यावर पीएमपीएमएल प्रशासनाशी चर्चा करून पुर्ववत केला जाईल. "

स्थानिक नगरसेवक नाना काटे म्हणाले, " भविष्यातील सुखसोयी करीता विकास कामे करणे गरजेचे असते. परंतु कामे करीत असताना त्रुटी राहत असल्या तरी त्या दुरूस्त करून पुढे चालायचे असते. नित्याचीच वाहतुक कोंडी पाहता येथे उड्डान पुल व ग्रेडसेपरेटर गरजेचा आहे. बस थांब्याचा आरसीसी पाया तेवढाच जेसीपीद्वारे काढत आहे. परंतु बाकी लोखंड व इतर गोष्टींचा पुनर्रवापर होणार आहे. त्यामुळे नासधुसीचा जास्त प्रश्नच नाही. 
 
नगरसेवक बापु काटे म्हणाले, " पुण्याहुन डांगे चौकाकडे जाताना दोन लेन जाण्यासाठी व दोन लेन येण्यासाठी असा मोठा उड्डान पुल व दोन लेन चा ग्रेडसेपरेटर झाल्याने हा चौक सिग्नल फ्री होऊन वाहतुक कोंडीची समस्या दूर होणार आहे. साई चौक ते मानकर चौक येथील जागा ताब्यात नव्हती. सहा वर्षे हे प्रकरण न्याय प्रविष्ठ होते. त्यामुळे आता जागा ताब्यात आल्याने काम सुरू झाले आहे. "

Web Title: commoners are sad due to romved brt bus stop