कंपनी आणि कामगारांनी एकमेकांना समजून घ्यावे - दिलीप वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग होत असेल, तर तो थांबला पाहिजे. या कायद्यात सुधारणांची आवश्‍यकता असेल, तर कायद्याशी संबंधित सर्व घटक व कामगार नेत्यांसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. 
- दिलीप वळसे पाटील, कामगारमंत्री

पुणे - ‘कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांच्या अपेक्षा भिन्न आहेत. कामगार आणि मालक हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. स्पर्धात्मक युगात गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्र आणि कामगारांना टिकायचे असेल तर सर्वांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. कालबाह्य कायद्यांमध्येही बदल करणे गरजेचे आहे,’’ असे मत कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटतर्फे ‘नवीन राज्य सरकारकडून उद्योग जगताच्या अपेक्षा’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. 

कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक, कायदेतज्ज्ञ व कामगार संघटना या सर्व घटकांशी चर्चा करून औद्योगिक क्षेत्रात सलोख्याचे वातावरण टिकून राहील यासाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्न आपण करू, असे सांगत कोणत्याही न्याय  मागण्यांसाठी व प्रश्नांसाठी उद्योग आणि कामगार विश्वातील कोणीही आपल्याकडे आल्यास आपण सर्व वेळ संपर्कात आहोत, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.      

Video : मुख्यमंत्र्यांना वाटते आपण शेतकऱ्यांचे तारणहार : राजू शेट्टी

राज्याच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, ‘एनआयपीएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, भारत फोर्जचे संचालक, मनुष्यबळ विकास व ‘एनआयपीएम’ राष्ट्रीय कार्यकारिणीचे मानद सदस्य डॉ. एस. व्ही. भावे, ‘एनआयपीएम’ पुणे विभागाचे कार्यकारी समिती सदस्य डॉ. राजेंद्र सबनीस, उमेश जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Companies and workers should understand each other