
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीत कैलास स्टील या छोट्याशा कंपनीत आज सकाळी पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान वराळे, ता. खेड गावच्या हद्दीतील कंपनीत व्यवस्थापक असलेल्या एकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कंपनीच्या प्रवेशद्वारातून बेछुट गोळीबार केला. दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबाराच्या हल्ल्यात कंपनी व्यवस्थापक अजित विक्रम सिंग (वय -40 वर्ष , रा. हिंजेवाडी ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही माहिती पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.