esakal | पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआरचा मोबदला
sakal

बोलून बातमी शोधा

 Pune Mumbai Highway

पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआरचा मोबदला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणाला गती, जागा मालकांना टीडीआरच्या स्वरूपात मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास आज (ता. ५) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली .

मुंबईकडे जाण्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता म्हणून हा महामार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावर सध्या स्वारगेट ते पिंपरीचिंचवड या मेट्रो मार्गाचेही काम सुरू आहे. हा विकास आराखड्यात या मार्गांची रुंदी ६१ मीटर इतकी दाखविण्यात आली आहे, त्यानुसार रुंदीकरण करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: Cruise Party प्रकरणात एकूण १६ जण अटकेत; कसून चौकशी सुरु

या कामासाठी ज्या जागामालकांची जागा जाणार आहे त्यांनी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे तडजोडीने प्राथमिक ताबा यादी तयार करून तात्पुरत्या जागेवरील भाडेकरूंचे पुनर्वसन केले आहे. त्यासाठी ७६ सदनिका महापालिकेने दिलेल्या आहेत. मोबदला मिळाल्यानंतर या भाडेकरूंकडून सदनिका रिकाम्या करून घेऊन त्या महापालिकेकडे जमा करण्याची जबाबदारी संबंधित जागा मालकांची आहे. त्यामुळे सदनिका मिळेपर्यंत जागा मालकास ८० टक्के टीडीआर दिला जाईल व सदनिका महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर उर्वरित २० टक्के टीडीआर दिला जाईल, असा निर्णय घेतल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

loading image
go to top