MPSC परिषद : ‘बिनधास्त बोला’तून दबलेल्या प्रश्नांना मिळालं व्यासपीठ

‘बिनधास्त बोला’ या परिषदेच्या शेवटच्या सत्रात उमेदवारांनी समस्यांचा पाढाच वाचला.
MPSC Conference
MPSC ConferenceSakal

पुणे - निवड होऊनही नाकारलेल्या नियुक्त्या, न्यायालयातील दाव्यामुळे लांबलेली प्रक्रिया, लॉकडाउनमुळे संपलेली वयोमर्यादा, सरळसेवेतील गोंधळ, विद्यावेतनाचा प्रश्न आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भरडलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रश्नांना सोमवारी वाट मोकळी करून दिली. अगदी पोटतिडकीने उमेदवारांनी आलेल्या अडचणींची, अनुभवांची आणि अपेक्षीत बदलांची मांडणी ‘एमपीएससी परिषदे’मध्ये केली.

‘बिनधास्त बोला’ या परिषदेच्या शेवटच्या सत्रात उमेदवारांनी समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी व्यासपीठावर राज्य लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ. अरुण अडसूळ, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, राष्ट्रवादी युवक संघटनेचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, मनसेच्या प्रदेश उपाध्यक्ष रूपाली पाटील आणि सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार उपस्थित होत्या. राज्यातील भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सक्षमपणे व्हावी, सरळसेवा भरती एमपीएससीच्या माध्यमातून घ्यावी, प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवाव्यात अशा मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. डॉ. अडसूळ म्हणाले, ‘‘क्षमता आणि गुणसंपन्न असूनही आज विद्यार्थ्यांना संधी मिळत नाहीत. सामाजातील सहजीवन त्यांना योग्य ओळख देण्यात कमी पडत असून, आमच्या सारख्या शिक्षकांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्वांनीच हा विषय गांभिर्याने घ्यायला हवा. सर्व पदभरतीसाठी एक सक्षम आयोगाची निर्मिती करण्यात यावी, ज्यामध्ये या सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करता येईल.’’ उमेदवारांनीही स्वतःच्या क्षमतांची चाचपणी करावी, आपले कुवत ओळखून शहाणपणाचे निर्णय घ्यावे, असे आवाहनही डॉ. अडसूळ यांनी केले. चर्चासत्राला उपस्थित तीनही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

MPSC Conference
रिझर्व्ह बॅंकेकडून पुणे जनता सहकारी बँकेला ३० लाखांचा दंड

प्लान ‘बी’तयार ठेवा...

स्पर्धा परीक्षांमध्ये सिलेक्शनपेक्षा रिजेक्शन सर्वाधिक असते. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्लान बी तयार ठेवावा. सामाजिक मोठेपणा किंवा क्षमता नसतानाही स्पर्धा परीक्षांमध्ये गुंतु नये असा सल्ला दुसऱ्या सत्रातील तज्ज्ञांनी दिला. यावेळी रक्षक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह पाटील, पुण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. सत्राचे संचालन सुहास घटवाई यांनी केले. आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचे वर्षे आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीला देतो. आपल्या क्षमता, सजगता आणि मर्यादांचा विचार करून ही तयारी करावी, असे मत तज्ज्ञांनी यावेळी मांडले.

विद्यार्थ्यांचे प्रश्न

- भरतीचा कालावधी लोटला म्हणून नाकारलेल्या नियुक्त्या परत मिळाव्यात

- वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दोन संधी द्याव्यात

- महाज्योतीचे ऑफलाइन तासिका आणि विद्यावेतन वाढावे

- सरळसेवा भरती एमपीएससीकडे द्यावी

- मुलाखतीपर्यंत पोचलेल्या उमेदवारांना इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात

- एमपीएससी अधिक सक्षम करावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com