Pune News : ४७० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला; नामनिर्देशित नसलेल्या संस्थेत वर्गीकरण

स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आलेल्या ४७० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (टीआरटीआय) नियमबाह्य आणि मनमानी कारभारामुळे लागले टांगणीला.
TRTI

TRTI

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आलेल्या ४७० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (टीआरटीआय) नियमबाह्य आणि मनमानी कारभारामुळे टांगणीला लागले आहे. एका संस्थेवर कारवाई करताना ‘टीआरटीआय’ने सर्व नियम धाब्यावर बसवून या विद्यार्थ्यांना अधिकृत यादीत नसलेल्या आणि निविदा प्रक्रियेबाहेरील दुसऱ्याच संस्थेत परस्पर वर्ग केले आहे. या अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांचे नियमित प्रशिक्षण पूर्णपणे ठप्प झाले असून, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com