संकट काळात शिक्षक प्रत्यक्ष राबवित असलेल्या शिक्षण पद्धतीचे होणार आता संकलन

Online-Education
Online-Education

पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शिक्षक शक्य होईल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचवत आहेत. त्यासाठी ते कधी शाळेतून किंवा घरातून थेट ऑनलाइन येत आहेत, तर कधी आकर्षक व्हिडीओ तयार करून, व्हाट्सवर अभ्यास पाठवून विद्यार्थ्यांना शिकवित आहे. इंटरनेट, मोबाईल पोचू शकत नसेल, तर शिक्षक स्वतः पायपीट करत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिकवत आहे. अशाप्रकारे संकट काळात शिक्षक प्रत्यक्ष राबवित असलेल्या शिक्षण पद्धतीचे आता संकलन होणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) पुढाकार घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यस्थितीत शाळा, महाविद्यालये बंद असताना, राज्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून, तर डिजीटल साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, किंवा शिक्षक मित्र यांच्या मदतीने अशा वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला तसेच अन्य राज्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत सादर करण्याच्या दृष्टिने शिक्षकनिहाय ऑनलाइन आणि ऑफलाइन अध्ययन-अध्यापन पद्धतीच्या माहितीचे दर आठवड्याला संकलन केले जाणार आहे, अशी माहिती परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

शिकविण्याच्या पद्धतीचे असे होणार संकलन
- एससीईआरटीच्या वतीने "http://covid19.scertmaha.ac.in" या पोर्टलवर शिक्षकनिहाय माहितीचे संकलन केले जाणार आहे.
- शिक्षकांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची असून त्यात दर आठवड्याला माहिती भरायची आहे.
- पोर्टलवरुन शिक्षक, शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हानिहाय शिक्षकांचे विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याच्या प्रयत्नांचा अहवाल केला जाणार आहे.

हे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे
"शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत. असे असताना त्यांच्या कामाचा अहवाल मागणे चुकीचे आहे. हे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे झाले. विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कामात व्यग्र असताना अहवाल पाठविण्याच्या कामाची त्यात भर पडल्याने काम वाढले आहे."
- माधव सूर्यवंशी, शिक्षक, खार एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि ज्युनियर काॅलेज, मुंबई कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com