'तेलंही गेलं अन् तूपही गेलं'; कर्ज मिळालं नाहीच, पण हातचे गमावले १५ लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Fraud

फरीद शेख आणि त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांना एक शैक्षणिक संस्था विकत घ्यायची होती. मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी कर्ज घेण्याचे ठरविले होते.

'तेलंही गेलं अन् तूपही गेलं'; कर्ज मिळालं नाहीच, पण हातचे गमावले १५ लाख

पुणे : शैक्षणिक संस्था विकत घेण्यासाठी निघालेल्या चौघांना त्यासाठी लागणारे दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून एका महिलेसह दोघांनी 15 लाख रुपयांना गंडा घातला. 10 कोटी तर दूरच राहीले, पण 15 लाख रुपये मात्र त्या चार नागरिकांना गमाविण्याची वेळ आली. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

लग्न की करिअर ? मुलींपुढे पडला प्रश्‍न​

फरीद शेख (वय 51, रा. घोरपडे पेठ) आणि त्यांच्या अन्य तीन सहकाऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे. शेख यांनी या फसवणूकीप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यावरुन आशिष रामटेके आणि अन्विता निलकंठ अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडले असे की, फरीद शेख आणि त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांना एक शैक्षणिक संस्था विकत घ्यायची होती. मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी कर्ज घेण्याचे ठरविले होते. फिर्यादी यांची सप्टेंबर 2018 मध्ये आशिष रामटेके याच्यासमवेत ओळख झाली होती. त्यावेळी रामटेके याने एका वित्तपुरवठा कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारी महिला अधिकारी आपल्या ओळखीची असल्याचे तसेच तिच्या मदतीने कर्ज मिळू शकेल, असे फिर्यादींना सांगितले.

'एमसीव्हीसी'च्या विद्यार्थ्यांचे भविष्य येणार धोक्यात; अभ्यासक्रम बदलण्याचा राज्य सरकारचा घाट!

त्यानुसार, फिर्यादींनी रामटेकेच्या मध्यस्थीने संबंधीत महिलेशी संपर्क साधला. त्यावेळी महिलेने त्यांना 10 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी कर्जाच्या रकमेच्या एक टक्के प्रक्रिया शुल्क, प्रिमीयम खाते यासाठी फिर्यादींकडून 15 लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना कर्ज मिळावे, यासाठी महिलेकडे सातत्याने पाठपुरावा केला. कर्ज मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी दिलेली 15 लाखांची रक्कम पुन्हा मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, महिला आणि रामटेके यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर फिर्यादी यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले. तर रामटेके हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top