प्रारूप मतदारयादीतील घोळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elections voter lists

निवडणुकीसाठी आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी ३१ मे २०२२ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे.

प्रारूप मतदारयादीतील घोळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पुणे - महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत अर्धवट नाव असणे, पत्ता अर्धवट असणे, फोटो नसणे यासह अनेक चुका आहे. बहुतांश प्रभागात असे एक हजारांपासून ते साडेचार पाच हजारापर्यंत मतदार आहेत. हे मतदार बोगस असल्याचा आरोप यापूर्वीपासून केला जात असताना आता अशा मतदारांविरोधात महापालिका आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत. या नावांबाबत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी करणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी ३१ मे २०२२ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रभागनिहाय प्रारूप रचना जाहीर केल्यानंतर सुमारे पावणेपाच हजार हरकती आल्या आहेत. त्या हरकतींची पडताळणी करून १६ जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत आहे.

प्रशासनाने ही पडताळणी सुरू केलेली असताना मतदारयादीत केवळ मतदाराचे केवळ नावच आहे, आडनाव व पत्ता नाही. काही जणांचा पत्ता हा हडपसर एरंडवणे असल्याचे नमूद केले आहे. तसे पाहता या दोन्ही भागांचा भौगोलिक संबंध नाही. पण असे चुकीचे पत्ते सर्वच प्रभागात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचीही डोकेदुखी सुरू वाढली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या निवडणूक शाखेने ३ हजार ५१७ हरकतींचा निपटारा केला आहे. उर्वरित हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी सुरू आहे. १६ जुलै पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

Web Title: Complaint District Collector About Confusion In The Draft Voter List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top