esakal | बारामती : धनगर समाज आणि गोपीचंद पडळकरांच्या बदनामीबद्दल पोलिसांत तक्रार दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand_padalkar

फेसबुक अकाउंट वरून धनगर समाजाची आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील शब्दात लिखाण केले आहे त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

बारामती : धनगर समाज आणि गोपीचंद पडळकरांच्या बदनामीबद्दल पोलिसांत तक्रार दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : धनगर समाज आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची अत्यंत अश्लिल शब्दात बदनामी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसात गुरुवारी (ता.८) तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी तक्रार दिली.

या बाबतच्या तक्रारीवर बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सुधाकर पांढरे,  वसंत घुले, नवनाथ मलगुंडे यांच्या सह्या आहेत. यात असे नमूद करण्यात आले आहे की, शशांक तुकाराम मराठे याने (प्लॉट नंबर 28 टी/7 व अंगणवाडी रोड 12 गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई महाराष्ट्र ) शशा मराठे या फेसबुक नावाने फेसबुक अकाउंट वरून धनगर समाजाची आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील शब्दात लिखाण केले आहे त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

Corona: रुग्णांसाठी बेडचा ‘मुंबई पॅटर्न’ राज्यभर; मुख्य सचिवांनी दिली माहिती​

अशा विकृत व्यक्तींकडून नेहमीच महापुरुष आणि जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्या जातात, अशा विकृत बुध्दीच्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडतात, हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही निवेदन पाठवणार असल्याचे डॉ. अर्चना पाटील यांनी यावेळी सांगितले.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image