esakal | एेकलंत का? पैशांसाठी महिलेकडून बलात्काराची खोटी तक्रार... 
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पैसे मुदतीत न देता आल्याने संबंधित व्यक्ती पैसे देण्यासाठी सतत मागणी करत शारिरिक संबंधाची मागणी करत होता. तसेच, त्याने वेळोवेळी बलात्कारही केला, असा आरोप महिलेने केला होता. दरम्यान, तपासात या महिलेने,

एेकलंत का? पैशांसाठी महिलेकडून बलात्काराची खोटी तक्रार... 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : उसणे घेतलेल्या पैशांच्या किरकोळ कारणावरून बलात्काराची खोटी फिर्याद दाखल करणा-या एका महिला फिर्यादीस येथील न्यायालयाने आज खडे बोल सुनावले. या सर्व प्रकरणात न्यायालय व पोलिसांचा वेळ वाया घालवल्याचा ठपका ठेवत तिच्याविरुध्द कडक कारवाईचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...


या प्रकरणात एका विवाहितेने एका व्यक्तीविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली होती. त्यावरून वालचंदनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात संबंधित महिला व तिचा पती यांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. मात्र, पैसे मुदतीत न देता आल्याने संबंधित व्यक्ती पैसे देण्यासाठी सतत मागणी करत शारिरिक संबंधाची मागणी करत होता. तसेच, त्याने वेळोवेळी बलात्कारही केला, असा आरोप महिलेने केला होता. दरम्यान, तपासात या महिलेने, बलात्कार झाला नसून, केवळ पैशाची मागणी करत असल्याचे पोलिसांसमोर जबाबात नमूद केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांच्या पुढे झाली. विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी दुसरा जबाब न्यायालयापुढे मांडला. यात न्यायालय व पोलिसांचा वेळ वाया जातो, ही बाब जोशी यांनी मांडली. न्यायाधिशांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला. तसेच, या प्रकरणात पोलिस व न्यायालयीन यंत्रणेचा वेळ वाया गेला. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला विनाकारण न्यायासाठी झगडावे लागल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, खोटा गुन्हा दाखल करणाऱया महिलेविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई पोलिसांनी करावी, असे आदेश दिले.