वीजयंत्रणेविषयी तक्रार आहे? मग मोबाईल घ्या आणि करा 'या' क्रमांकावर व्हाट्सअप

Complaints of Electricity now MSEDCL on Whatsapp
Complaints of Electricity now MSEDCL on Whatsapp

पुणे : पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी आता "व्हॉटस्‌ ऍप'चे व्यासपीठ महावितरणने उपलब्ध करून दिले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून व्हॉटस्‌ ऍपद्वारे प्राप्त झालेल्या फोटो माहिती अथवा तक्रारींनुसार वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. तसेच संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्‍यांसाठी 7875768074 हा व्हॉटस्‌ ऍप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याच्याच फोटोसह माहिती व तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना कॉल करू नये, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस्‌ ऍप नाहीत त्यांनी "एसएमएस'द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. 
-------------
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट
-------------
सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !
------------
व्हॉटस्‌ ऍपद्वारे महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर आलेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. तक्रारीनुसार वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस्‌ ऍपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन वीजसुरक्षेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com