पुणे - गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासनाने सुरक्षिततेबाबत काटेकोर आराखडा तयार केला आहे. उत्साहाला अनुशासनाची जोड महत्त्वाची आहे. विसर्जन मिरवणुकीत लेजर लाइटवर पूर्ण बंदी राहील. तसेच, मंडळांनी स्वयंसेवकांची व्यवस्था करून डीजे यांसारखे अनुचित प्रकार टाळावेत, असा स्पष्ट संदेश पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला.