पुणे - पुणे महापालिकेने यापूर्वी शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ९) बंद असणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात आता कोथरूड, वारजे, बाणेर, बालेवाडी, कर्वेनगर, सेनापती बापट रस्त्याच्या दोन्ही बाजू आदी भागाचा समावेश केला आहे. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचाच पाणी पुरवठा बंद असणार असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी (ता. १०) दुपारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल अशी माहिती महापालिकेने दिली आहे.